– चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.
– औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.
– कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.
– कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे.
– विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे. इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे.
’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !
– आपटे रोडवरच्या शाहजी पराठा हाउस मध्ये पराठे अप्रतिम मिळतात. थोडे महाग आहेत. पण वर्थ व्हिजिट. साधा अँबियन्स चालणार असेल तर त्यांची मूळ शाखा लक्ष्मी रोडवर आहे. तिथे किंमती कमी आहेत. इथला चुर चुर नान, अमृतसरी नान आणि बनारसी आलू पराठा केवळ अप्रतिम. दाल लसूनी पराठीही उत्तम. लस्सी देखील सुंदर.
– कोथरुडला (पौड रोड) स्ट्यु आर्ट हे अतिशय अप्रतिम छोटेसे हॉटेल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्यु अतिशय दर्जेदार मिळतात. हंगेरियन गुलाश खास प्रसिद्ध.
– कोल्हापुरचे राजमंदिर आइसक्रीम आता पुण्यात सुरु झाले आहे. कोथरुड डीपी रोड (म्हातोबा मंदिरापासुन गणंजय सोसायटीवर जाणारा रस्ता) वर आहे. येथील रेड पेरु आइसक्रीम केवळ अप्रतिम. बाकीचीही आइसक्रीम बरी आहेत. पायना स्ट्रॉबेरी हा एक वेगळा फ्लेवरही मिळतो इथे.
– ढोले पाटील रोडवर द्रविडा’स बिस्ट्रो नव्याने सुरु झाले आहे. सिटी पॉइंट मध्ये. उत्कृष्ट दाक्षिणात्य पदार्थ मिळतात. इथली थाळी देखील सुंदर.
– रोल्स मॅनियाच्या शाखा ठिकठिकाणी आहेत. त्यांचे सगळेच रोल्स सुंदर आहेत.
– औंधला स्किप्स नावाचा कॅफे आहे. येथील ब्रेकफास्ट आणि सँडविचेस अतिशय सुंदर.
– कोथरुडला करिष्माच्या येथील खाऊ गल्लीत सिन सिटी नावाची बेकरी आहे. येथील सर्वच केक्स सुंदर. खास करुन इटालियन कसाटा, हनी अल्मंड तर लय भारी.
– कोथरुडला कोकण एक्स्प्रेसच्या गल्लीत मस्ती मिसळ आणि पौड फाट्यावर किमायाच्या पुढच्या (कोथरुड कडुन नळ स्टॉप कडे जाताना) गल्लीतली कोल्हापुरी मिसळ निरातिशय सुंदर.
– बावधनला त्रिकाया नावाचे हॉटेल आहे. अँबियन्स दर्जेदार. जेवण आवडेलच असे नाही. पण येथील लेमन कॉरियंडर सुप अतिशयच दर्जेदार.
-भांडारकर रोडवर एक फ्रेंच बेकरी आहे. नाव नीट्से आठवत नाही (ले प्स्लेजर की कायसे नाव आहे). येथील मेकरुन आणि चीझकेक खुप सुंदर.
– भाउ पाटील चौकात दिल्ली चाट दरबार सुरु झाले आहे. अस्सल दिल्ली साएड चाट आणि छोले भटुरे मिळतात.
– जोगेश्वरी मंदिर ABC चौकात सुप्रिम सँडविचेस मध्ये जवळपास १३५ प्रकारचे लज्जतदार सँडविचेस मिळतात.
– मॉडेल कॉलनीत ऑरियँटल वोक आहे. इथले बर्मीज खाउ सी जरुर ट्राय करावे.
-जे जे गार्डनचा वडापाव पुण्यात प्रसिद्ध आहेच. त्यांची एक शाखा आता नळ स्टॉप वर समुद्रच्या लायनीत, कॉटनकिंगच्या बाजुला सुरु झाली आहे.
-बाणेर भागातल्या हॉटेल्स बद्दल फार माहिती नसल्यास, तिथे ‘वे डाऊन साऊथ’ नावाचं फाईन-डाईन रेस्टॉरंट आहे. असंख्य प्रकारचे डोसे/उत्तपे. खूप छान चव, मात्र फार महाग
-बाणेर-पाषाण रस्त्यावर सॅफरन नावाचे रेस्टॉरंट आहे, सी-फूड उत्तम
-एम.जी. रोडवरील ‘मार्झो-ओ-रीन’ मधे चवदार सँडवीच मिळतात. आणि होममेड टाईप पिझ्झाज्/बर्गर ही मस्त असतात.
पुणे तिथे काय उणे 🙏